- शनिवारी चिंचवडगावात योगेश सोमण यांचे व्याख्यान
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- हिंदू स्वाभिमान दिवसनिमित्त पिंपरी चिंचवड मधील हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध सिने कलाकार व व्याख्याते योगेश सोमण यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच त्यांना या वेळी हिंदू कुलभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर श्रीमती मंगलताई तुळशीराम साळुंके (१९७१ च्या भारत पाक युध्दात हुतात्मा झालेले तुळशीराम साळुंके यांच्या वीरपत्नी) यांना वीरपत्नी पुरस्कार; महाराष्ट्र आर्य वीर दलाचे अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे यांना स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती पुरस्कार व समाजसेवा पुरस्कार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजंमगुंडे यांना स्व. संजय आर्य स्मृती युवा जागृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम उद्या शनिवारी (दि. ११ मे २०१९) सायं. ६.३० वाजता चिंचवडगाव चापेकर चौक, हुतात्मा चापेकर स्मारक वाचनालय हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.











