- बारा वर्षांचा मुलगा ठार तर, सात वर्षांची चिमुकली गंभीर जखमी..
- अल्पवयीन टेम्पोचालक आणि टेम्पो मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२४) :- भोसरीतील स्पाईन रस्त्यावरून महिला दुचाकीस्वार या त्यांच्या १२ वर्षीय मुलाला आणि त्याच्या ७ वर्षांच्या लहान बहिणीला क्लास सुटल्यावर इंद्रायणीनगर येथील घरी स्कुटीवरून घेऊन जात होत्या. त्यावेळी विधीसंघर्षित मुलाने त्याच्या ताब्यातील थ्री व्हिलर टेम्पो निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन स्कुटीला डाव्या बाजुने डॅश देत अपघात केला.
त्यामध्ये त्यांचा १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्याच्या मृत्युस व सात वर्षांच्या हर्षिका हिला जखमी करण्यास कारणीभुत झाला आहे. स्कुटीचेही नुकसान केले आहे. तसेच थ्री व्हिलर टेम्पो मालक यांचा टेम्पो चालविणारा मुलगा हा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याच्याकडे वाहन चालविण्याचे लायसन्स नसताना त्याला टेम्पो चालविण्यास दिला, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि.२०) रोजी ४.३० वा. सुमारास एम.आय. डि.सी. भोसरी पोलीस स्टेशन समोर, स्पाईन रोड भोसरी येथे घडली.
महिला फिर्यादी यांनी आरोपी १) थ्री व्हिलर टेम्पो क्र.एम.एच.१४ के.यु.७९७० वरील चालक विधी संघर्षित बालक (वय १७ वर्षे, ११ महिणे २६ दिवस, शिक्षण, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) आणि २) श्रीनिवास थोरात (रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) या दोघांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ५३९/२०२४ भाज्या.सं. कलम १०६ (१),२८१,१२५ (ब), ३२४ (४) सह मोवाका कलम ११९/१७७,१८४, १९९ए (१) (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चिट्टमपल्ले पुढील तपास करीत आहेत.