न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२४) :- नायजेरियन नागरिकाने अवैधरित्या वास्तव्य केले. जाणीवपूर्वक भारतीय नागरिकांना देय असलेले मतदान ओळखपत्र व पॅनकार्ड गैरमार्गाने मिळवले. तसेच आधारकार्ड मिळवण्यासाठी काकीनाडा, आंध्रप्रदेश येथे अर्ज केलेला आहे.
वास्तव्याकरिता व्हिसाची मुदतवाढ न घेता विनापरवाना अवैधरित्या वास्तव्य तसेच व्यवसाय करुन व्हिसा नियमांचे उल्लंघन करुन भारत सरकारची फसवणूक केली आहे. ही घटना सन २०१७ पासुन ते दि.२०/१०/२०२४ पर्यत हैद्राबाद तेलंगणा, काकीनाडा आंध्रप्रदेश, निगडी, उंड्री पुणे शहर, पिंपळे गुरव येथे घडला.
चिडीऐबेरे मोसेस ओगबोडो (देश-नायजेरिया सध्या रा. शर्मा हाऊस, प्रभातनगर, स.नं.७७, पिंपळे गुरव) असं अटक आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात ४३४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३३६ (२) (३), ३३८. सह परकीय नागरीक अधिनियम कलम १४(अ) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि भालेराव पुढील तपास करीत आहेत.