न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२४० :- “मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, देशात आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या एकूण १० भाषा असतील, पूर्वी ६ होत्या. त्यामुळे अडीच हजार वर्षे इतिहास असंलेल्या मराठी भाषेला ४५० पेक्षा जास्त विद्यापीठात स्थान मिळेल. केंद्राच्या निधीमुळे भाषा भवन ही उदयास येईल.” असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व कवी, मिठीभाई महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ.सुरेश वाकचौरे यांनी रौप्यमहोत्सवी काव्यमित्र संस्थेच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा व कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
औचित्य होते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी जे अब्दुल कलाम यांची जयंती व मदर इंडिया पुरस्कृत आदर्श माता श्यामलादेवी अब्रोल ह्यांचा स्मृतीदिन .कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिवहार मरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व जागतिक विक्रमवीर डॉ.विजयकुमार पाटील, डॉ. संतोष पाचपुते, रश्मीकुमार अब्रोल, काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर हे उपस्थित होते.
उद्योजक शिवहार मरे म्हणाले, “उद्योजक आयुष्यभर कौटुंबिक व उद्योग विकास करत असतो परंतु आपण लेखनाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून समाजाचे देणे फेडण्याचे कार्य करत असता म्हणूनच तुमचे कार्य आमच्यापेक्षा महान नक्कीच आहे.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” काव्यमित्र संस्थेचा गेल्या २५ वर्षाचा प्रवास अदभुत आहे, संस्थेने १०० पेक्षा जास्त पुस्तकांचे ,काव्यसंग्रहांचे, कादंबरींचे प्रकाशन केलेले आहे.हजारो दिव्यांग व वंचितांना मदत केलेली आहे. नवोदित कवींना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.१२ राज्यात १० हजार कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे .गरीब, भटक्या ,पालावरच्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था निर्माण करून दिली. अश्या दैदिप्यमान संस्थेचे कार्य राजेंद्र सगर सरांच्या माध्यमातून सुरू आहे. देशाला अनेक बुद्धिजीवी कार्यकर्ते ,समाजसेवक या काव्यमित्र संस्थेमुळे मिळाले.”
कवी व लेखक आय के शेख, गणपत तरंगे,योगिता नेमाडे, जयश्री श्रीखंडे, श्रीकांत जगताप, मनीषा पाटील यांनी त्यांच्या कविता सादर केल्या. राष्ट्रीय पातळीवर उद्योगक्षेत्र ,साहित्यिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.सुरेश वाकचौरे, चांद शेख, विलासराव जाधव,अशोक आदलिंगे, सचिन डोंगरे, आशिष क्षीरसागर,नामदेवराव हुले, दीपक शर्मा, विकास नवघरे, जयश्री पाटील, रुचिता बंडी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राध्यापक संतोष पाचपुतेंना नुकतीच पी एच डी प्रदान झालेबद्दल त्यांचा डॉ.सुरेश वाकचौरे व डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विशेष परिश्रम राज बनसोडे, सूर्यकांत शेटकार, प्रभू चाजक, राहुल चव्हाण, हरिनाथ कांबळे,डॉ संजय जगताप, अशोक माळी, तुकाराम गुंटे, स्वप्नील सगर यांनी घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक राज बनसोडे यांनी केले, सूत्र संचालन आदर्श शिक्षिका सविता शिंदे यांनी केले.आभार संयोजक राजेंद्र सगर यांनी मानले.












