न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान येथे स्वतंत्र स्वीप कक्षाच्या माध्यमातून मतदारांना येत्या निवडणुकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.
भक्ती शक्ती येथील कार्यक्रमात मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किशन केंगले, लिपिक अभिजित डोळस यांच्यासह सचिन महाजन, पियुष घसिंग, श्रेयस जाधव यांच्या उपस्थिती मोठ्या संख्यने नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा नागरिकांनी निर्धार केला.
महापालिकेच्या स्वीप कक्षामार्फत आज भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे खाजगी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्यात उपआयुक्त राजेश आगळे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पालकांना मतदान करण्याबाबत शपथ दिली. तसेच मतधिकाराचे महत्व पटवून सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


















