न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- विरारमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी क्रिडा स्पर्धेत वयोगट १९ वर्षाखालील मुले या प्रकारात टाटा मोटर्स विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
विद्यानिकेतन स्कूलकडून मयंक खैरनार, श्रेयस विनोद, वेदांत दाभाडे, यांनी गोल नोंदविले व गोलकिपर रुद्र चव्हाण यांनी चमकदार कामगिरी केली. अर्थव फेगडे, नैतिक आटोळे, हिमांशु पल्हाडे, श्रीजी महेश, आदित्यराज घोलप, प्रथम देशमुख यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेसाठी विद्यानिकेतन क्रिडा संचालक शैलेंद्र पोतनीस, क्रिडा प्रशिक्षक अमित थोरात यांचे बहुमल्य मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. विद्यानिकेतन स्कूलच्या प्राचार्या दिपीका गवस यांनी सहकार्य केले.