- निवडणूक कार्यालयाकडून आज अखेर १३० अर्जांची विक्री…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज गुरुवारी (दि. २४) रोजी विहित वेळेत तिस-या दिवशी एकुण ९ व्यक्तींनी एकुण २३ नामनिर्देशन अर्जांची खरेदी केली आहे.
दरम्यान आज अखेर एकुण ६३ व्यक्तींनी एकुण १३० नामनिर्देशनपत्रं विकत घेतले असुन एका उमेदवाराने एक नामनिर्देशन पत्र निवडणूक कार्यालयात दाखल केले आहे.
आज नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील :- सावळे सिमा राजेंद्र, काळूराम मारुती पवार, अजय सुधाकर गायकवाड, प्रतिक्षा अर्जुन कांबळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), डॉ.मनिषा सुमंत गरुड (गायकवाड) (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुरेश हरिभाऊ भिसे, सुलक्षणा राजू धर (राष्ट्रवादी कॉग्रेस,शरदचंद्रजी पवार), लक्ष्मण (दादा) आत्माराम शिरोळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गट), रीता प्रकाश सोनवणे, यांनी एकुण २३ नामनिर्देशन अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच आज अखेर एकुण ६३ व्यक्तींनी एकुण १३० नामनिर्देशन पत्रे विकत घेतली असुन एका उमेदवाराने एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
















