- आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमाची मावळातील शेतकऱ्याला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२४) :- जमीनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता टाळाटाळ केली. व्यवहारा दरम्यान वारसदारांबाबतचे खोटे प्रतिज्ञापत्र देत फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच त्यांना शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देतो, असे सांगुन आरटीजीएस व चेकव्दारे ४०,००,०००/- रुपये तसेच जमीनीच्या खरेदी कामाच्या विसार पावतीसाठी ५,००,०००/- रुपये, असे एकूण ४५,००,००० रुपये आरोपीने स्वीकारले.
तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या पैशाच्या बदल्यात ९९,००,००० रुपयांच्या चेकवर फसवणुक करण्याच्या उददेषाने अर्धवट सही करून फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच सोमाटणे येथील तलाठी कार्यालयात हरकत अर्ज दाखल केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी यांना ‘तुम्ही हरकत का घेतली’, अशी विचारणा केली. त्यावर ‘मला अधिकचे पेमेट ५०,००,००० रुपये दे, नाही तर मी किवा माझ्या भावंडातील लोकांना सांगुन तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुला अडकवेन, तु माझ्या नादी लागलास तर तुझी सुपारी देऊन तुझा काटा काढील’, अशी धमकी दिली.
हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते दि.३०/०५/२०२३ दरम्यान चांदखेड, परंदवडी, सोमाटणे, ता. मावळ जि. पुणे येथे घडला. फिर्यादी (वय ४० वर्षे, शेती, रा.मु पो. धामणे ता. मावळ जि.पुणे) यांनी आरोपी शैलेद्र निवृत्ती निकाळजे (वय ५४ वर्षे, रा.एन सी १४ धोबी घाट, गणेशखिंड पुणे विदयापीठ पुणे) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
शिरगाव पोलिसांनी २३८/२०२४ भा.द. वि. कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१,३८४,५०६,१९३(२),१९९,२०० प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पोउपनि लोहेकर पुढील तपास करीत आहेत.