न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- दहा वर्षांच्या चिमुकलीसमोर हैवान झालेल्या बापाने आईचा वायरच्या सहाय्याने गळा आवळून खून करून मुंबईला गेल्याची पोलिसांना माहीती मिळाली होती. सांगवी पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी मुंबईस रवाना झाले होते. तो अंधेरी पूर्व परिसरातील सुभाषनगर भाजी मंडईत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली व तिथून त्याला अटक करण्यात आली. उत्तम महादू जाधव (रा, गंगानगर, रहाटणी, मूळ रा. लातूर) असे आरोपीचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८) रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास रहाटणीतील गंगानगरमध्ये घडली होती. वंदना उत्तम जाधव (रा, गंगानगर, रहाटणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पुंडलिक श्यामराव वाघमारे (३४, रा. पवनानगर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम याला दारूचे व्यसन आहे. तो दररोज दारूच्या नशेत पत्नी वंदना आणि मुले ओंकार, दीपाली यांना मारहाण करीत होता.











