न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- सासरवाडीत औषध आणि वस्तू घेण्यासाठी गेलेल्या माय-लेकाला पत्नी आणि तिच्या आईने चावा घेत जबर मारहाण केली. ही घटना बुधवार (दि .८) रात्री नऊच्या सुमारास चिंचवडच्या मोहननगर येथील मंगलम अपार्टमेंट महावीर पार्क येथे घडली.
नितीन रमेश निमराण (वय ३४, रा. लोणावळा) असे जखमी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पत्नी शितल नितीन निमराण (वय ३४, रा. महाविर पार्क, मोहननगर, चिंचवड) आणि सासू आशा अविनाश भोसले (वय ५८) या दोघिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघिंविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.











