- राष्ट्रवादी पवार गटाचे अजित गव्हाणे यांच आव्हान किती टिकणार?..
- भोसरी मतदारसंघात चर्चांना उत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२४) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण ११ उमेदवार असले तरी महायुतीतील भाजपचे महेश लांडगे व महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यातच दुरंगी सामना रंगणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भोसरीतून उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनी माघार घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे तिरंगी लढत होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, उद्धवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने सोमवारी बंडखोर रवी लांडगे यांनी अर्ज मागे घेतला. महायुती आणि महाविकास आघाडीत दुरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. लांडगे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अजित गव्हाणे यांना मैदानात उतरवले आहे.
बंडखोर रवी लांडगेंच्या माघारीमुळे आ. महेश लांडगे यांची मेट्रो विना अडथळा सुसाट धावणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा मोठ्या मताधिक्क्याने ते पराभव करतील, अशी कुजबुज भोसरी मतदारसंघात सध्या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मागील दोन निवडणुकांत बाजी मारली असून, यंदा ते हॅट्ट्रिक करतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.












