न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्च २०१९ रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांना आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. पर्यायाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विकास कामे, कल्याणकारी योजना, महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यास निर्बंध आले आहेत.
महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात नमूद विकास कामे व त्या अनुषंगाने निविदा मागविणे, निविदा उघडणे निविदा मंजर करणे, करारनामा करणे, काम सुरू करण्याचे आदेश देणे, अंदाजपत्रकातील कामांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता देणे, देखभाल दुरूस्तीची कामे, कार्यालयीन कामकाजाची स्टेशनरी व साधन सामग्री खरेदी करण्यास आचारसंहितेमुळे बंधणे आली आहेत.
त्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.











