न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ११ दवाखाना व रुग्णालयातही हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे रुग्णांना व नातेवाईकांना आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे.
या केंद्राच्या सुचनेनुसार नुकतेच महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी करण्यात आली.
केंद्राच्या सुचनेनुसार आकुर्डी, तालेरा व यमुनानगर रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आकुर्डी रुग्णालयातील शिबिरास डॉ. सुनिता साळवे, वैद्यकीय अधिकारी विजय माथने, डॉ. उज्ज्वला पगारे, डॉ. अनुपमा सोनकर, आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ. अद्वैत मेमन, योगा प्रशिक्षक स्वाती आल्हाट उपस्थित होते.
तालेरा रुग्णालयातील शिबीरास ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनादेवी गंभीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील, आयुर्वेदतज्ञ डॉ. अविनाश देवरे, योगा प्रशिक्षक स्वाती आल्हाट, आहारतज्ञ पल्लवी तुपकर व पीएचएन अनुपम वेले आदी यावेळी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये असंसर्गजन्य रोग, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, योगासने याबाबतची माहिती तज्ञ डॉक्टरानीं दिली. योगासने व आयुष काळाची गरज याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले.











