न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- शरयु संतोष दाभाडे हीने लंडनमध्ये ‘जागतीक व्यापार’ या विषयात मेरीटमधे एम.बी.ए शिक्षण पुर्ण केले आहे. तिचा पदवी प्रदान समारंभ नुकताच लंडन येथील कोवेंन्ट्री महाविद्यालयात लंडनच्या चान्सलर डॉ. हेनी वेल्स यांच्या हस्ते पार पडला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले, लंडन येथील कोवेंन्ट्री महाविद्यालयात आमच्या मुलीने यश प्राप्त केले याचा आमच्या संपूर्ण दाभाडे कुटुंबाला अभिमान वाटत आहे.
शरयुने कोरोना काळात रुग्णांची मनोभावे सेवा केली होती. त्यावेळी ती सात दिवस अलगीकरण कक्षामध्ये होती. यामुळे तिच्या कार्याची दाखल घेऊन तिला कोरोनायोद्धा हा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. लंडनमध्ये राहुन तिने मेरीटमधे एमबीए हे शिक्षण पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.











