न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुक कालावधीमध्ये सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी २०४ मावळ विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार मावळ यांनी वेळोवेळी प्रशिक्षणाबाबत शाळेच्या प्राचार्यांना आदेशित केले होते. हा आदेश स्विकारण्यास त्यांनी नकार दिला. निवडणुक अधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून निवडणुकी सारख्या राष्ट्रीय कामात अडथळा केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२१/१०/२०२४ ते दि ३१/१०/२०२४) दरम्यान माउंट सेट अँन हायस्कुल, तळेगाव दाभाडे येथे घडला. फिर्यादी लिंबराज व्यंकट सलगर (वय ५० वर्षे, व्यवसाय मंडळ अधिकारी, तळेगाव दाभाडे) यांनी आरोपी प्राचार्य, माउंट सेट अँन हायस्कुल, तळेगाव दाभाडे ता मावळ जि पुणे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ४६६/२०२४ लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुल्ला पुढील तपास करीत आहेत.











