न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२४) :- रुमचा पत्रा वाजविल्याच्या कारणावरून भांडण करून खुन करणाऱ्या दोन आरोपींना देहूरोड पोलीसांकडुन अटक करण्यात आली आहे. आरोपी भोगेंद्रकुमार जोखन सदाय (वय २३ वर्षे, रा. अपोल पॅकेजिंग सनसवाडी, शिक्रापुर पुणे मुळ रा. गंगापुर ता. नखरूड जि. मधुबनी राज्य बिहार), जयप्रकाश रामकिसन सदाय (वय १९ वर्षे, रा. हांडेवाडी, कात्रज, पुणे मुळ रा. गंगापुर ता. नखरूड जि. मधुबनी राज्य बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मयताचा भाऊ प्रमोद मोहित यादव याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा मयत भाऊ अमोदकुमार मोहित यादव हा मित्रांसोबत असताना जयप्रकाश व भोगींदर यांनी घराचा पत्रा वाजविल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी त्याच्या भावास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने डोक्यात व पाठीत मारहाण करून जखमी केले होते. त्याचा भाऊ अमोदकुमार याचा औषधोपचार दरम्यान मृत्यु झाला.
देहूरोड पोलिसांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. आरोपी भोगेंद्रकुमार हा गुन्हा करून शिक्रापुर येथे पळुन गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्याला शिक्रापुर येथुन दोन तासाच्या आत ताब्यात घेतले. त्याचा साथीदार जयप्रकाश याच्या मदतीने खून केल्याची कबुल त्याने दिली. जयप्रकाश हा खेड शिवापुर येथुन कुर्ला, मुंबई येथे जावुन कुर्ला येथुन ट्रेन पकडुन त्याचे मुळ गावी मधुबनी, बिहार येथे ट्रेनने पळुन जात असताना त्याला भुसावळ रेल्वे जंक्शन येथुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. नमुद गुन्ह्यात आरोपींची दिनांक ०८/११/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी असुन देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.


















