न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ नोव्हेंबर २०२४) :- मावळ विधानसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार सुनिल शेळके आणि आणखी एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरगाव ते सोमाटने मार्गावर प्रचार रॅली दरम्यान आढले खुर्द व चांदखेड येथे (दि. ५) रोजी रात्री १०.०० ते ११.५० वा.चे दरम्यान हा प्रकार घडला. त्यांनी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडील एक खिडकी माध्यमातून घालुन दिलेल्या नियम व अटींचा तसेच जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांच्याकडील दिलेल्या आदेशातील तरतुदीचा भंग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणी दिपक भाऊराव राक्षे (वय ५३ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, सोमाटणे फाटा) यांनी फिर्याद दिली होती. शिरगाव पोलिसांनी २५७/२०२४ भा.न्या.सं. कलम २२३ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पारखे पुढील तपास करीत आहेत.

















