- उपचारासाठी रूग्णालयात दाखल न करताच थेट सोडले घरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयाचा ढिसाळ कारभार सुरुच आहे. शस्रक्रिया उपचारासाठी अति दक्षता विभागात आलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल न करता थेट घरी सोडल्याची घटना नुकतीच घडली.
महिलेला तोंडाने पाणी सुद्धा पिता येत नव्हते. हलाखीची स्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी डॉक्टरांनी उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्याचे सोडून कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
याबाबत जनधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी रुग्णालयाच्या करभारावर संताप व्यक्त केला. दोषी डॉक्टरांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे.

















