- अपक्ष उमेदवार खुदूबुद्दीन होबळे याचं मतदारांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२४) :- रुपीनगर मधील सामान्य कष्टकरी वर्गाचे होणारे हाल व विविध समस्या संपुष्टात आणण्यासाठी तुमच्यातीलच एक सामान्य व कष्टाची जाण असलेला माझ्यासारख्या उमेदवाराला आपला मतदानरुपी आर्शिवाद देऊन विजयी करा, असे आवाहन भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुतबुद्दीन होबळे यांनी रुपीनगरमधील प्रचार फेरी वेळी येथील मतदारांना केले. यावेळी अनेक मतदारांनी होबळे यांच्याशी संवाद साधत येथील अनेक अडचणीचा पाढा वाचला.

भोसरी परिसरातील सर्वात जास्त मतदार असलेला प्रभाग म्हणून रुपीनगर-तळवडे परिसराकडे पाहिले जाते. या परिसरात चाकरमानी व बहुतांशी राज्यातून व परराज्यातुन रोजगारासाठी आलेल्या कष्टकरी वर्गाची वसाहत आहे. येथील अनेक अडचणीला येथील मतदार एकाकी झुंज देत असून अनेक राजकारणी वर्गाने या परिसराकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील मतदारामध्ये भोसरीतील दोन्ही प्रमुख उमेदवारामध्ये रोष असून येथील मतदार तिसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्यामुळे येथील जनात माझ्याच पाठीशी उभी राहून ‘हंडी’ या चिन्हासमोरील बटन दाबून मलाच निवडून देतील, असा विश्वास अपक्ष उमेदवार कुतबूद्दीन होबळे यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रचार फेरीला होबळे यांना मतदारांनी उत्तमरित्या प्रतिसाद देऊन येथील नागरीकांनी देखील अनेक समस्या कथन करुन सध्याच्या लोकप्रतिनिधीवर कमालीचा राग व्यक्त केला.
















