- नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक पोलीसांच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२४) :- भोसरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज रविवारी (दि. १७) रोजी प्रचार सभेकरीता गावजत्रा मैदान, भोसरी येथे उपस्थित राहणार आहेत.
या सभेच्या अनुषंगाने पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भोसरी वाहतुक विभाग अंतर्गत दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.०० पर्यंत अथवा प्रचार सभा संपेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे…
१) पुणे नाशिक महामार्गावरील गुडविल चौक येथे नाशिक फाटा ते भोसरी, चाकणकडे जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने पुणे नाशिक महामार्गावरील → एमआयडीसी चौक सरळ गुजर गॅस लेप्ट टर्न पीएमपीएमएल वर्क शॉप, नेहरूनगर येथुन लेफ्ट टर्न गुडविल चौक येथुन लेप्ट टर्न घेऊन फुलेनगर झोपडपट्टी उजवीकडे वळून हॉकी स्टेडियम सरळ अनुकूल चौक पुढे स्पाईन रोडने स्पाईन मॉल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी ओव्हर ब्रीज हा सर्व प्रकारच्या वाहनांना जाणे-येण्याकरिता बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने नाशिक पुणे महामार्गावरुन चाकणकडून नाशिक फाटा जाणारी वाहने ही भोसरी ओव्हर बीजवर न जाता भोसरी सर्व्हिस रोडने पीएमटी चौक, दिघी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
















