- अज्ञाताकडून कंपनी मालकाला गंडा घालण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२४) :- आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या नावाचा गैरवापर केला. स्वतः फोनवर बोलत असल्याचा अविर्भाव आणत आंबेठाण येथील आर्जी प्लॅस्टीक प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक आश्विन गर्ग यांच्याकडे ‘आम्हाला काही सहकार्य होईल का, आता अडचणीत आहे’, अशी मदतीची अज्ञाताने याचना केली.
मदतीच्या नावाखाली पैसे अथवा इतर काही मालमत्ता मिळवण्यासाठी फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार (दि. १६) रोजी दुपारी २.०७ वाजता घडला. याप्रकरणी फिर्यादी सुमित मच्छिंद्र मोहीते (वय २७ वर्ष, रा. शेलपिंपळगाव) यांनी आरोपी मोबाईल क्र. ७८७५६१९९६१ यावरील अनोळखी व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ७९०/२०२४ भारतीयन्याय संहीता २०२३ चे कलम २०४,३१९ (२),६२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ मोरे पुढील तपास करीत आहेत.
















