- एका रिक्षा चालकाचा घेतला जीव; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२४) :- मद्यप्राशन करुन विधीसंघर्षीत बालक चालकाने स्कॉर्पिओ हे वाहन चालवले. वाहन भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्गावर रहदारीच्या रस्त्यावर चालवुन डिव्हायडरवर चढवुन रस्त्याच्या विरुध्द बाजूस जावून पुणेकडून नाशिककडे जाणा-या गाडयांना धडक दिली.
त्यात रिक्षा, टीव्हीएस कंपणीची मोपेड गाडी, होंडा कंपनीची ड्रीम युगा या गाडयांचे नुकसान केले. रिक्षा चालकाच्या मृत्युस चालक कारणीभुत होवुन इतर दोन वाहनांवरील चालकांना गंभीर व किरकोळ दुखापती केल्या. तसेच स्वतःच्या ताब्यातील वाहनांसह तिन्ही वाहनांच्या नुकसानीस आरोपी चालक कारणीभूत झाला आहे. हा प्रकार (दि.१६) रोजी रात्री ९.४५ वा.चे सुमा. एमएसईबी ऑफिससमोर, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथील सार्वजनिक रोडवर घडला.
याप्रकरणी मुर्तजा अमिरभाई बोहरा यांनी आरोपी विधीसंघर्षीत बालक स्कॉपिओ गाडी नंबर एम.एच १४ जी वाय ५६६९ वरील (विधीसंघर्षीत) चालक विधीसंघर्षीत बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी (दापोडी) पोलिसांनी ७५८/२०२४भा.न्या.सं. कलम १०५,२८१,१२५ (अ),१२५ (ब), ३२४ (४), ३ (५) मो.वा.का. कलम १८५,१८०,१८१,१८४,११९/१७७,१३४ (अ) (ब) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले आहे. पोउपनि महाजन पुढील तपास करीत आहेत.

















