न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२४) :- विनापरवाना, बेकायदेशीरपणे पैशावर तीन पत्ते जुगार खेळताना व पत्ते, रोख रक्कम, असा एकुण ९,७५०/-रु. किं. च्या मालासह सहा जन मिळुन आले.
ही कारवाई (दि.१७) रोजी सायंकाळी ६.२५ वा. रामदासनगर गल्ली नंबर १ सोनवणेवस्ती रोड, चिखली येथे पत्र्याचे शेड लगत मोकळया जागेत पोलिसांनी केली.
याप्रकरणी आरोपी १) हरीष पाडुरंग रोकडे, वय ३६ वर्षे रा. देहु आळंदी रोड फाईन वजनकाटा सेजारी चिखली पुणे २) महिंद्र रविंद्र रोकडे वय ३२ वर्षे रा. चिंतामननगर रोकडेवस्ती, चिखली पुणे ३) राजु मारुती कळमकर वय ५३ वर्षे रा. रामदासनगर चिखली पुणे ४) भागवत त्र्यंबक साबळे वय ४० वर्षे रा. रामदासनगर गल्ली नं. आप्पा यादव यांचे चाळीत भाड्याने चिखली पुणे ५) कैलास अशोक शिंदे वय ४५ वर्षे रा. मोरेवस्ती कृष्णा हौसिंग सोसायटी चिखली पुणे ६) श्रीराम उध्दव नालेगावकर वय ४० वर्षे रा. केशवनगर संतोष नेवाळे यांचे रुममध्ये भाड्याने चिखली यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ७१९/२०२४ महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा १४८३ कुहें पुढील तपास करीत आहेत.

















