- संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे संघटनेचे सर्व सहकारी, कामगारांची साथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजक संघटनेेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. संघटनेचे नोंदणीकृत सदस्य उद्योजक ४ हजार २०० हून अधिक आहेत. लघु उद्योजक आणि कामगार असा सुमारे ४० हजाराहून अधिक जनसमुदाय आमदार लांडगे यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार लांडगे यांची ताकद आणखी वाढली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांना पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिले आहे.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, सहसचिव प्रविण लोंढे, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धीप्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, विनोद मित्तल, प्रमोद राणे, भारत नरवडे, अतूल इनामदार, सचिन आदक आदी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, उद्योजकांच्या आणि औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम पुढाकार घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची दोनदा शहरात बैठक झाली होती. तसेच, मुंबईतही संघटनेच्या पदाधिकारी आणि उद्योगमंत्र्यांची बैठक झाली होती. उद्योजकांच्या समस्या सोडवण्याबाबत महायुती सरकार आणि आमदार महेश लांडगे सकारात्मक भूमिका घेतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकरी, कर्मचारी महेश लांडगे यांना पाठिंबा देत आहेत.

















