न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- दुकान घेण्यासाठी माहेरहून सहा लाख रुपये आण, म्हणून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना निगडी येथे ९ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सुरक्षा अमोल मस्के (वय-२३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील लक्ष्मण महादेव थोरात (वय-४५ रा. भोरीभडक, पो. भोरीअहीमली, ता. दौंड) यांनी निगडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अमोल दत्तू मस्के (वय- २६), दत्तू रामा मस्के (वय- ६२) व केसरबाई दत्तू मस्के (वय- ५५ सर्व रा. संजय नगर निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.











