न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.१०) व शनिवारी (दि. ११) यादरम्यान दोन दिवस ई-पॉस मशिनचा सर्व्हर डाऊन झाला होता. दुकानदारांकडून धान्याचे वाटप थांबले होते. प्रशासनाकडून ई पॉस मशिनशिवाय धान्य वाटप न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यामुळे धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांमध्ये वाद निर्माण होत होता. अनेक वेळेस या अडचणी येत आहेत. त्यामुळे दुकानदार व शिधापत्रिकाधारक यांना नाहक त्रास होत आहे व काही वेळेस त्यांच्यात त्यावरून खटकेही उडतात.
तसेच शासनाने धान्य दुकानदारांचे कमिशन बंद केले आहे. त्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासह या मशिनमध्ये अनेक अडचणीही आहेत. त्यामध्ये त्वरित सुधारणा करण्याची मागणी ऑल इंडिया फेरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी शासनाकडे केली आहे.











