न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे २०१९) :- घातक शस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. त्याच्याकडून कोयत्यासारखे (पालघन) धारधार हत्यार जप्त करण्यात आले आहे. वाकड पोलिसांनी शनिवारी (दि. ११) रोजी काळेवाडी येथे ही कारवाई केली.
दीपक आबा दाखले (वय २३, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी दीपक हा परिसरात दहशत पसरविण्यासाठी घातक शस्त्र जवळ बाळगत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी काळेवाडी येथील कुणाल हॉटेलच्यामागे सापळा रचून दीपकला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ शंभर रुपये किंमतीचे कोयत्यासारखे हत्यार मिळून आले आहे. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.











