न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२४) :- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्यात शहरातील ६७१ शाळांपैकी एकही शाळा ‘सुंदर शाळा’ ठरली नाही. पहिल्या टप्प्यात शहरातील खासगी अनुदानित ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने २१ लाख, तर पालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाने १५ लाखांचे बक्षीस मिळवले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात बदललेले निकष पूर्ण करण्यात शाळा अपयशी ठरल्या. परिणामी सर्व शाळा अपात्र ठरल्या, अभियानात शहरातील प्राथमिक विभागाच्या ३४३, माध्यमिक विभागाच्या ३२८ शाळांनी सहभाग घेतला. दुसऱ्या टप्यातील शाळांचे तालुकास्तरीय मूल्यांकन केले होते.
ऑनलाइन मूल्यांकनासाठी केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली होती. मात्र, शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यात मागील वर्षी शाळांचा पुरस्कार प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी निवड झालेल्या शाळांचा विचार केला जाणार नाही, असा बदल केला. त्यामुळे, उर्वरित शाळांना वरचा टप्पा पार करण्यास कष्ट घ्यावे लागले. शाळास्तरावरील स्काऊट-गाइड, महावाचन चळवळ, अध्ययन निष्पत्ती, समित्यांचे अद्ययावतीकरण, शिक्षकांचा गुणात्मक विकास, क्षमतेनुसार वर्गखोल्या या बाबी पुरस्कारासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
शाळांचा भौतिक, शैक्षणिक विकास यासह पालक सहभाग वाढविण्यासाठी शासन सर्व माध्यमांच्या शाळांना प्रोत्साहन देत आहे. या अभियानाला शाळांचा चांगला प्रतिसाद आहे. अनेक शाळांच्या मूल्यांकनात निकषांची कमतरता जाणवली. पिपरी-चिंचवडमधील शाळांच्या तुलनेत इतर शाळांनी निकषांची पूर्तता केली आहे. शाळांनी निकषांवर काम करून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
– संजय नाईकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद…













2 Comments
tlover tonet
Thanks for helping out, good information. “A man will fight harder for his interests than for his rights.” by Napoleon Bonaparte.
Watch Basketball Online
incrível este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para saber mais. Obrigado a todos e até a próxima. 🙂