महापालिका आयुक्तांचे फर्मान..
नियमांना बगल दिल्यास पालिकेकडून कारवाईचे संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 नोव्हेंबर 2024) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. त्यामुळे आता महापालिकेतील कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक यांना हेल्मेट परिधान करूनच महापालिकेच्या प्रवेशद्वार अथवा आवारात प्रवेश करावा लागेल. तशा सुचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पालिकेला याबाबत कार्यवाहीचे करण्याचे संकेत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीचा फतवा काढण्यात आला होता. तसा आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला पाठवला होता. त्या आदेशात महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती बाबत आदेशित करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्येच महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू झाली होती. परंतु महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या आवारात येणाऱ्या सर्वच कर्मचारी, अधिकारी, नागरिकांना हेल्मेट सक्ती लागू केली आहे.
कामानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेत आज शुक्रवारी विना हेल्मेट आलेल्या नागरिकांना आयुक्तांनी अचानक काढलेल्या फातव्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना प्रवेशद्वाराच्या बाहेरच सुरक्षारक्षकांनी अडवले. त्यामुळे नागरिकांना काम न करताच माघारी फिरावे लागले.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुरक्षा विभागाचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला. त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्मेट सक्ती बाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आयुक्तांनी सुद्धा तशा सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
हेल्मेट सक्तीबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या सुचनांमुळे आता नागरिक देखील हेल्मेट सक्तीच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत. त्यांना देखील हेल्मेट परिधान करूनच महापालिकेत प्रवेश करावा लागेल. नियमांना बगल दिल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.













2 Comments
Valentin Madron
Do you mind if I quote a couple of your articles as long as I provide credit and sources back to your website? My blog is in the exact same niche as yours and my visitors would certainly benefit from some of the information you provide here. Please let me know if this alright with you. Many thanks!
Major Sports Events Online
This design is wicked! You certainly know how to keep a reader amused. Between your wit and your videos, I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Excellent job. I really loved what you had to say, and more than that, how you presented it. Too cool!