न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ मे २०१९) :- चिंचवडमधील केशवनगर प्रभाग क्र:१८ मधील शामा हेरिटेज सोसायटी मध्ये दि.११ मे रोजी रात्री २ च्या दरम्यान अचानक मीटर बॉक्स मध्ये मोठी आग लागली.
या वेळी सदस्य महाराष्ट्र महावितरण समितीचे मधुकर बच्चे म्हणाले की, मला २/३ लोकांचे फोन आले मी १० मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहचलो. त्वरित फायर ब्रिगेडची गाडी येऊन आग विझवली व महावितरणच्या अधिकार्यांना संपर्क करून त्वरित घटनास्थळी कर्मचारी येऊन विद्युत पुरवठा बंद केला, म्हणून मोठी दुर्घटना व आर्थिक हानी टळली.
लागलेल्या आगी दरम्यान या सोसायटीमधील के बिल्डिंग मधील १४ मीटर व सर्व जोडणी पूर्णपणे जळून खाक झाली. वेळेत सर्व कार्यवाही केल्यामुळे आग पसरली नाही अन्यथा आगीच्या खूप जवळपास दुचाकी व जवळच कार पार्किंग होत्या. सोसायटीतील सर्व नागरिक त्वरित घरातून खाली आले.
आग लागलेली सोसायटी वगळता उर्वरित सर्व सोसायटींचा रात्री ३:३० पर्यंत मी स्वता थांबून विद्युत पुरवठा सुरू करून घेतला.
मी वेळेत दखल घेऊन सर्व प्रक्रिया जलद केल्यामुळे खूप मोठी दुर्घटना व आर्थिक नुकसान टळले असे सर्व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि हिच प्रामाणिक कामाची पावती व आनंद असतो हे मी मानतो. सकाळी संबधीत अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना झालेल्या प्रकाराची चर्चा करून पूर्ण माहिती देऊन सर्व नागरिकांना मीटर त्वरित उपलब्ध करून विद्युत पुरवठा लवकर चालू करण्यास सांगितले.
महावितरण अधिकाऱ्यानीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रक्रिया फास्ट करण्याचे आश्वासन दिले व त्याप्रमाणे त्वरित प्रक्रियाही सुरू केली.सर्व नागरिकांना एक दिवसात १४ मीटर उपलब्ध करून देऊन विद्युत पुरवठा सुरू करून दिला. महावितरण अधिकारी वायफळकर, जाधव, व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार. असे मधुकर बच्चे म्हणाले.















