- पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाची माहिती..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६डिसेंबर २०२४) :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव २६ डिसेंबरला सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी- चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
लिलावात सहभागी होण्याकरीता १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत www.eaubtion.gov.in या संकेतस्थळावर ऑनलइन पद्धतीने नाव नोंदणी करावी. लिलावाचे अटी व नियम ९ डिसेंबर रोजी पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
तसेच सदरची वाहने पाहण्याकरीता ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी- चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत. वाहने जशी आहे तशी या तत्वावर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
वाहनांची यादी संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय पुणे शहर, हवेली, जून्नर, मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी राखून ठेवले आहेत.











