न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे (दि. ०७ डिसेंबर २०२४) :- सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा चारशेवा जयंती सोहळा रविवार (दि. ८) रोजी उत्साहात साजरा होणार आहे.
त्यानिमित्त सुदुंबरे येथे श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांच्या उपस्थितीत विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मोशीचे सुरेश चौधरी व भिकाजी भोज यांच्या शुभ हस्ते ठीक सकाळी आठ वाजता श्रींचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या सोहळ्यास राज्यभरातील भाविक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.











