- देशाच सुप्रीम कोर्ट निवडणुकीबाबत आशावादी..
- रखडलेल्या निवडणुकांच्या कारणांच वर्गीकरण करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई दि. ०७ डिसेंबर २०२४) :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका लवकरच होऊ शकतात. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
‘ईशाद’ या संस्थेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्वाची टिपण्णी केली.
न्यायालयात निवडणूकांबाबत विविध याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे केवळ महाराष्ट्र नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. त्यावर कोर्टाने निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं संकेत दिले आहेत.
प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा व परिस्थिती वेगळी आहे, जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देता येतील, असंही कोर्टाने म्हटलय.