- काळजेवाडीतील दोघा तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- सफाई कॉन्ट्रक्टचे काम करायचे असेल तर, महिना १५,०००/- रु प्रमाणे वर्षाचे एकुण १,८०,०००/- रुपये खंडणीची दोघांनी फिर्यादीकडे केली. तसेच ५०००/- रुपये गुगल पे वर खंडणी म्हणून स्विकारले आहेत.
ही घटना (दि. १३) रोजी सायंकाळी ५.०० वा ते ७.०० वा.चे सुमा. वेलींगटन नविन बिल्डींगजवळ, प्राईड वल्ड सिटी, च-होली बु. येथे घडली. याप्रकरणी चिन्ना व्यंकटेश्वरा राव वेराय्या गुंजा (कॉन्ट्रॅक्टर) यांनी आरोपी १) आकाश सत्यवान तापकिर (वय २८ वर्षे, रा. ताजणेमळा, काळजेवाडी च-होली), २) प्रधुन्य हिरामण पानसरे (वय २६ वर्षे, रा. ताजणेमळा, काळजेवाडी, च-होली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ५४५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(१), ३०८ (२), १२६(१), ३(५) प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भामरे पुढील तपास करीत आहेत.


















