न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२४) :- रेल्वे प्रशासनाने चिंचवड येथील आनंदनगरमधील ८८ कुटुंबीयांना जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसमोर आता कुठे राहायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुष्काळग्रस्त भागामधून अनेक कुटुंबीय १९७२ मध्ये आनंदनगरमध्ये वास्तव्यास आली. सध्या येथे दाट लोकवस्ती बनली असून, लोकसंख्या २० ते २५ हजारांहून अधिक आहे. येथील नागरिकांनी महापालिकेचा कर, वीजबिल आदी सर्व करांची पूर्तता केली. आज ५० वर्षांनंतर येथील नागरिकांना जागा रिकामी करण्यासाठी नोटिसा आल्यानंतर दुसऱ्या घराची व्यवस्था नसताना कुठे जावे, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे एसआरएची घरे मिळेपर्यंत रेल्वे विभागाने निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या नोटिसीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. ‘एसआरए’ची घरे मिळेपर्यंत रेल्वे विभागाने नोटिस माघारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.











