न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२४) :- सांगवीमध्ये महिलेच्या डोक्यात हातोडा मारून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन चोरट्याने पळ काढण्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारी चार ते पाच च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सांगवी पोलीस, गुन्हे शाखा आणि गुंडा विरोधी पथक अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी वरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पन्नास वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी करून गळ्यातील सोनसाखळी चोरली. घटनेनंतर अज्ञात आरोपी हा पसार झाला आहे. अज्ञात आरोपी हा हेल्मेट परिधान करून आणि तोंडाला फडके बांधून आला होता.
ही घटना सांगवी येथी महाराष्ट्र बँक चौकात घडली आहे. घटनास्थळी सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखा आणि गुंडाविरोधी पथक दाखल झालेल आहे. जखमी झालेल्या पन्नास वर्षीय महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.












1 Comments
Fern Klare
whoah this weblog is wonderful i love reading your posts. Keep up the good paintings! You know, many persons are hunting around for this information, you could help them greatly.