न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस बांधवांसाठी हक्काचे घर मिळणे दुरापास्त झाले आहे. संपूर्ण राज्यात अशीच विदारक परिस्थिती आहे. जिथे घरे आहेत. ती पडक्या अवस्थेत आहेत. तरीही पोलिसांचे कुटुंब त्या पडक्या जागेत आपल्या फाटक्या संसाराचे रहाटगाडे चालवतच आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ पोलिसांचीही तीच बोंब आहे. याबाबत महाराष्ट्र शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्याक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नी लक्ष देण्याबाबत पत्र पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासुन आपल्या खात्यांच्या अंतर्गत नगरविकास व गृहखाते आहे. पोलिसदल आधुनिक व सर्वसंपन्न बनविण्याची आपली व आपल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी हक्काचा निवारा आपण दिला पाहिजे. परंतु, कुठल्याही प्रकारचे गांभीर्य आपल्याला व आपल्या प्रशासनाला नाही. असे निदर्शनास आले आहे.
मावळातील पोलिस बांधवांच्या घर बांधणीचा प्रस्ताव तात्काळ मुंजुर करून, शुभारंभ करावा. येत्या २१ दिवसांच्या आत आपल्याकडुन कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास आपल्या व आपल्या प्रशासनाच्या विरोधात पोलिस बांधवांच्या निवारणासाठी शिवसेना स्टाईलने शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल. याकामी उद्भभनार्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली राहील, असे दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.


















