न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- एकटेपणा आणि दुर्धर आजाराने ग्रस्थ असलेल्या खराळवाडी परिसरात ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घराच्या शेजारी असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपचंद धोंडीराम सुंदेचा असे आत्महत्या करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री घराच्या बाहेर येऊन वृद्ध रुपचंद यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेत ते ७३ टक्के भाजले आहेत.
त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.











