न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२४) :- शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी हे सर्वसामान्य नागरिकांना दाद देत नसल्याचा आरोप करत थेट पोलीस आयुक्तांना पत्र दिलं होतं.
पोलीस सर्वसामान्यांच्या तक्रारी घेत नाहीत असा आरोप त्यांनी केला. अप्रत्यक्षपणे श्रीरंग बारणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावर आरोप केल्याने भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीरंग बारणे हे आमच्याच महायुतीत आहेत. आमच्यासोबत ते काम करत आहेत. मी त्यांच्याशी याबाबत बोलणार आहे. त्यांना कुठे आणि कसली अडचण आहे. हे जाणून घेणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्रिपद सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असे काही घडेल असे मला वाटत नाही. त्यामुळं श्रीरंग बारणे यांनी काळजी करू नये, असं गोरखे यांनी आवाहन करत खोचक टोला लगावला आहे.















1 Comments
Jamie Zarco
obviously like your web-site but you need to take a look at the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling problems and I to find it very bothersome to tell the reality on the other hand I?¦ll certainly come back again.