न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. २६ डिसेंबर २०२४) :- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मनमोहन सिंग यांची तब्येत खालावल्याने त्यांना गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता एम्समधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ९२ वर्षीय मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली असून अनेक नेते, तसंच दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची तब्येत अनेकदा बिघडली होती. गुरुवारी २६ डिसेंबर रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तसंच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१९८२ ते १९८५ या काळात डॉ. मनमोहन सिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरही होते. या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. १९९१ पासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. ते भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ देखील होते. १९९१ मध्ये त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.











2 Comments
tlover tonet
I saw a lot of website but I believe this one has something extra in it in it
Handball Live Stream Free
Have you ever considered publishing an ebook or guest authoring on other websites? I have a blog based on the same ideas you discuss and would love to have you share some stories/information. I know my readers would value your work. If you are even remotely interested, feel free to send me an e-mail.