न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ डिसेंबर २०२४) :- चिंचवड कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. ही पालक सभा विज्ञान आणि कला व वाणिज्य अशा दोन टप्प्यात झाली. या सभेत पालकांचा उत्फुर्त प्रतिसाद होता.
महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इयत्ता अकरावीचे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पण पुढे बारावीच्या दृष्टीने मुलांना नियमित अभ्यासाची सवय असणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून त्यांच्या अभ्यासा कडे कटाक्षाने लक्ष द्यावे.तसेच अभ्यासाच्या दृष्टीने मुलांनी प्रत्येक तासीकेला नियमित हजर राहणे आवश्यक आहेत.मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक दोघांचे सहकार्य महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे अनेक नियम व सूचना पालकांसमोर ठेवून या नियमांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करावे. अशा प्रकारे पालकांशी प्रश्नोत्तर संवादातून संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन ही केले. पालक सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे सभा उत्साहात पार पडली .
या सभेस संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा, उपप्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे, विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या समनवयिका डॉ. सुनीता पटनायक, प्रा. जस्मीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थिक होता.
या सभेचे सूत्रसंचालन डॉ रवींद्र निरगुडे, सुकन्या बॅनर्जी व अर्चना भट्टाचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सुनीता पटनाईक व प्रा. वैशाली देशपांडे यांनी केले.












1 Comments
tlovertonet
Thanks for another informative web site. Where else could I get that type of info written in such a perfect way? I’ve a project that I’m just now working on, and I have been on the look out for such information.