न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३७१ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यात पात्र झालेले उमेदवार रुजूही झाले. मात्र, त्यातील ६१ कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यासाठी त्यांनी विविधे कारणे सादर केली आहेत.
महापालिकेच्या वतीने रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या. यातील काही जागांमध्ये आरक्षणानुसार अर्ज आले नव्हते. त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवाव्या लागल्या. निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. ते रुजूही झाले; मात्र, २९ लिपिक, ४ कनिष्ठ अभियंता, २७ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १ समाजसेवक या पदावर रुजू झालेल्या एकूण ६१ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. विविध कारणे देऊन दिलेले राजीनामे आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर केले आहेत. त्यांच्या जागीही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. त्यांना त्या जागेवर रुजू करून घेतले जात आहेत. दरम्यान, अॅनिमल किपर या पदासाठी एकही अर्ज आलेला नाही, त्यामुळे ती जागा रिक्त आहे.
राज्य शासनाच्या इतर विभागांत चांगल्या पदावर संधी मिळाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोकरी नाकारली जात आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेले युवा उमेदवार राजीनामे देत आहेत. राजीनामा दिलेल्या पदांवरील जागांवर प्रतीक्षा यादीतील इतर उमेदवारांना संधी देण्यात येत आहे, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.













2 Comments
Whitney Hibma
I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks
Live NFL Streaming
Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.