- आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते निगडी बसस्टॉप येथे अन्नदान, वैद्यकीय मदत, रेनकोट व छत्री वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ जुलै २०२६) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी बसस्टॉप येथे वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम राबविण्यात आला. दोन ट्रक केळी, २५० किलो बुंदी लाडू, चहा-नाश्ता, रेनकोट, छत्री तसेच मोफत वैद्यकीय औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सचिन काळभोर, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे आयोजन भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केले. रमजान सनदी, रफिक शेख, राजू शेख, अक्षय सावंत, सुधीर भोसले व पप्पू हतागळे यांनीही सहकार्य केले.

















