- नव्याने पदनिर्मिती करणास प्रशासकांची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे नाव बदलून ते आता शहरी दळणवळण विभाग (अर्बन मोबोलिटी डिर्पाटमेंट) असे करण्यात आले आहे.
तसेच, या विभागासाठी सहशहर अभियंता (एक), कार्यकारी अभियंता (दोन), उपअभियंता (३), कनिष्ठ अभियंता (८) असे एकूण १३ पदनिर्मितीस महापालिका आकृतीबंधात मान्यताही देण्यात आली आहे.
महापालिकेत सध्या वाहतूक नियोजन विभाग अस्तित्वात आहे. कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड विभागप्रमुख आहेत. या विभागाकडे केवळ शहरातील बीआरटीएस मार्ग व प्रमुख रस्त्यांची जबाबदारी आहे. हा विभाग स्थापत्य प्रकल्प विभागाअंतर्गत आहे. पूर्वी त्या विभागाचे नाव बीआरटीएस विभाग असे होते. नंतर ते वाहतूक नियोजन करण्यात आले. आता त्यातही बदल करून या विभागाचे नाव शहरी दळणवळण विभाग असे करण्यात आले आहे.
नूतन नावाच्या विभागासाठी स्वतंत्र आकृतीबंध तयार करण्यात आला असून, स्वतंत्र सहशहर अभियंता असणार आहे. या विभागासाठी १ एप्रिल २०२५ पासून महापालिका अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूदही केली जाणार आहे.
महापालिकेतील स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, पर्यावरण अभियांत्रिकी या तीन विभागांप्रमाणे शहरी दळणवळण विभागास वेगळा सहशहर अभियंता असणार आहे. या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नूकतीच दिली आहे.













2 Comments
Modesto Nassif
I think other web-site proprietors should take this website as an model, very clean and magnificent user genial style and design, as well as the content. You’re an expert in this topic!
Live Nascar Series Stream
Greetings from Los angeles! I’m bored at work so I decided to browse your site on my iphone during lunch break. I really like the knowledge you present here and can’t wait to take a look when I get home. I’m amazed at how fast your blog loaded on my phone .. I’m not even using WIFI, just 3G .. Anyhow, very good blog!