न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- काळेवाडी येथील पाचपीर चौकातील बेकरीमध्ये माल ऑफरमध्ये विकत असल्याचा राग मनात धरून पंधरा लोकांच्या टोळक्यांनी दुकानात येऊन दुकान मालक व त्यांच्या दोघा भावांना शिवीगाळ, दमदाटी तसेच त्यांना मारहाण केली. आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याने त्यांना मुक्का मार लागला आहे.
ही घटना (दि. २६) दुपारी एक वाजून १५ मी. सुमारास काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी अखिल अन्सारी (वय ३० वर्ष, रा. पिंपरी) यांनी आरोपी असिफ उस्मानी, इमरान उस्मानी, सलमान उस्मानी, ताजुद्दीन अन्सारी, इरफान अन्सारी आणि यांच्यासह इतर आठ ते दहा लोकांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.













2 Comments
tlover tonet
Wow, awesome weblog format! How lengthy have you ever been blogging for? you made blogging look easy. The total look of your site is wonderful, as well as the content!
Lenard Hevrin
You have brought up a very superb details , thankyou for the post.