- तर, निगडित केवळ संशयावरून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तर, दुसऱ्याने पत्नी आणि प्रियकराच्या त्रासाला वैतागून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रावेत आणि निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेतील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पहिल्या घटनेत पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून राहत्या घरात झोपलेल्या तरुणाला घरात येऊन जाळून टाकण्याची धमकी दिली. त्याच्या घराचा दरवाजा पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आला. त्याच्या दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केले आहे. हा प्रकार (दि. २५) रोजी पहाटे एक वाजून ५२ मिनिटाच्या सुमारास मिलिंदनगर, ओटा स्कीम, निगडी येथे घडला आहे. या प्रकरणी दिलशाद अहमद (वय तीस वर्ष) यांनी आरोपी नबील जमीर शेख (वय ३८ वर्षे, रा. निगडी) याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत पत्नीचे बाहेर प्रेम संबंध होते. ते प्रेमसंबंध पतीला माहित झाले. त्यामुळे पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीला वारंवार त्रास दिला. तसेच पतीसह मुलांना मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला वैतागून ३७ वर्षीय पतीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पुनावळे येथे (दि. १३ नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेली आहे. संदीप शिंदे असे मयत पतीचे नाव असून त्यांच्या भावाने रावेत पोलीस ठाण्यात महिला आरोपी तसेच रोहित थोरात या दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. रावेत पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या दोघांना अटक केलेली आहे.













2 Comments
tlover tonet
Pretty! This was a really wonderful post. Thank you for your provided information.
Baseball Live Streams
Good day very nice web site!! Guy .. Beautiful .. Amazing .. I will bookmark your blog and take the feeds additionally…I’m glad to seek out numerous useful information right here in the submit, we’d like develop extra techniques on this regard, thanks for sharing. . . . . .