न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २९ डिसेंबर २०२४) :- श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. शैक्षणिक वर्ष २०२४–२०२५ मध्ये वर्षभर शाळेत ‘नदी – जीवन वाहिनी’ ही संकल्पना राबविली जात आहे. वर्षभर भारतातील विविध नद्या, त्यावरील धरणे, जल सिंचन योजना, विद्युत प्रकल्प, शेती व शहरासाठी पाणी पुरवठा योजना व सध्याच्या काळात नद्यांचे वाढत असलेले प्रदूषण व नद्यांच्या शुद्धिकरणासाठीची जनजागृती अशी विविध माहिती प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना करून दिली जात आहे. प्राथमिक विभागातील विद्यार्थी देखील विविध प्रकारचे प्रकल्प सादर करीत आहेत.
पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन देखील याच संकल्पनेतून साजरा करण्यात आला. या निमित्ताने नर्सरी, एलकेजी व युकेजी या पूर्व प्राथमिक वर्गातील बाल चमूंच्या विविध प्रकारच्या शर्यती घेण्यात आल्या. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य संकलन, नदीच्या पाण्याचा योग्य वापर, नदी शुद्धीकरण, जल वाहतूक, नदी हीच जीवन वाहिनी, प्रदूषण मुक्त नदी इ. शर्यतीतून बाल चमूंनी विविध प्रकारच्या साहित्यांच्या वापर करीत उपस्थित पालकांना प्रदूषण मुक्त नद्या व्हाव्यात असा संदेश दिला.
क्रीडा दिनाच्या सुरुवातीलाच मैदानावर येत बाल चमूंनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. आपल्या सर्व नद्या या प्रदूषण मुक्त व्हाव्यात व सर्वांनाच शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने बाल चमूंनी ड्रिल सादर करीत ‘SAVE ME’ या अक्षरांची निर्मिती करीत उपस्थित पालकांची दाद मिळवली.
या क्रीडा दिनाच्या निमिताने सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद, प्राथमिक विभागाचे शारीरिक शिक्षण शिक्षक अश्रफ शेख हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. पालकांशी सवांद साधत प्रा. विकास कंद यांनी ‘अपयश हीच यशाची पहिली पायरी असून या लहान वयातच मुलांना अपयश पचवायला शिकवा म्हणजे ही मुले निर्भीड होत भविष्यात निश्चितच यशस्वी होतील’ असे उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
क्रीडा दिन यशस्वी होण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. क्रीडा दिनाचे प्रास्ताविक पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक सौ. शुभलक्ष्मी पाठक यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. निशा आढावे व सौ. मनीषा जाधव यांनी केले तर सौ. संगीता रासकर यांनी पाहुणे व बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या पालकांचे आभार मानले.













1 Comments
tlovertonet
It?¦s really a nice and useful piece of information. I am satisfied that you shared this helpful information with us. Please keep us informed like this. Thank you for sharing.