न्यूज पीसीएमसी नेटवर्क
परभणी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- तिसरीही मुलगीच जन्माला घातली म्हणून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीत घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. तिसऱ्यांदाही मुलगीच झाली. तेव्हापासून या पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायची.
२६ डिसेंबरला रात्रीही दोघांमध्ये याच विषयावरुन भांडण सुरू झालं. संतापलेल्या पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि काडी पेटवली. बघता बघता पत्नीसह घरानंही पेट घेतला. एवढाश्या पत्र्याच्या खोपट्यातून पेटलेली ही महिला मदतीसाठी रस्त्यावर सैरावैरा पळू लागील आणि पळत शेजारच्या दुकानात पोहोचली.
आगीच्या विळख्यात सापडलेल्या महिलेला बघून आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र तोवर ही महिला गंभीररित्या भाजली होती. ती बेशुद्ध पडली. या सगळ्या आगीत दोन दुकानंही जळाली. गंभीर भाजलेल्या महिलेला स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र तोवर खूर उशीर झाला होता.













1 Comments
tlover tonet
Lovely just what I was searching for.Thanks to the author for taking his time on this one.