- महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२४) :- पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विधानसभा निवडणुकीपूर्वी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून थांबली होती. ती कारवाई पुन्हा सुरू करण्यात येणार की, त्याकडे दुर्लक्ष होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत असलेले २९ बंगले आणि इतर अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद तसेच, सर्वोच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनास दिले होते. कारवाईची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यास काही काळ अंतरिम स्थगिती मिळाली आहे.
महापालिकेने संपूर्ण शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण केले होते. त्यात बिगरनिवासी व निवासी बांधकामे अशी वर्गवारी केली होती. प्रथम बिगरनिवासी बांधकामांवर महापालिकेने केली होती.
विधानसभा निवडणुका लागणार असल्याने महापालिकेने ती कारवाई बंद केली होती. निवडणूक आता संपली असल्याने पुन्हा ही कारवाई सुरू करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, दुसरीकडे कारवाई होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव वाढला असल्याचे सूत्रांनी सांगितले.













2 Comments
Earl Lafarge
I definitely wanted to write a note to thank you for the superb secrets you are placing at this site. My long internet look up has at the end been compensated with brilliant tips to exchange with my relatives. I ‘d point out that many of us readers are quite lucky to live in a superb community with so many marvellous professionals with insightful strategies. I feel extremely fortunate to have discovered your website and look forward to plenty of more excellent minutes reading here. Thanks once again for everything.
Bundesliga Live Streaming
Hello. magnificent job. I did not imagine this. This is a fantastic story. Thanks!