न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०१९) :- लांडेवाडी येथे भोसरी-पिंपरी रस्त्यावरून पायी चालत जात असताना मागून येऊन तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १२) रोजी घडली आहे.
रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास अशोक आणि महादेव यांच्यामध्ये भांडण झाले. त्यावेळी महादेव याने मागून येऊन अशोकवर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये अशोकला डोक्यावर आणि हातावर गंभीर इजा झाली.
महादेव बाजीराव खाडे (वय ३०, रा. लांडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक रामभाऊ गव्हाणे (वय ३०, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलिसात फिर्याद दिली.











